श्रीगोंदा तालुक्यातील हा परिसर ‘नॉट रिचेबल’

Ahmednagarlive24
Published:

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसर गेली तीन – चार दिवस झाले ‘नॉट रिचेबल’ आहे .जीओ, आयडिया यांची सेवा विस्कळीत झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसह इतरांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरणगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, पिप्री कोलंदर, म्हसे, रायगव्हाण, राजापूर, माठ, उक्कडगाव देठदैठण, येवती आदि गावासह मोबाईलसेवा पुरवणाऱ्या जवळपास सर्वच कंपनीच्या सेवेला खीळ बसली आहे.

वारंवार फोन करूनही फोन न लागणे, लावल्यास तो लगेच कट होणे, स्क्रीन वर रेंज दाखवत असताना नंबर डायल केल्यावरही केवळ आपत्कालीन सेवा असा मॅसेज येणे, फोन कंनेट झाल्यावर आवाज न येणे, आदी समस्या उपभोक्त्यांना येत आहेत.

त्या आयडिया, जिओ या सेवेचा वापर करणारे या परिसरात मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. त्यांनी किमान त्रैमासिक सुविधा वापरण्यासाठी पैसे मोजले आहे. तरी य भागात लवकरात लवकर सेवा सुरळीत व्हावी अशी परिसरातून मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment