अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- धरणाचे दरवाजे उघडलेले पाहण्यास गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, मंगळवारी सकाळी मुळा धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला.
याचवेळी धरणाचे पहिले तीन दरवाजे उघडले, त्यांनतर सकाळी साडे नऊवाजेपर्यंत सर्व ११ दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले.
धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिल्याने धनराज त्यामध्ये अडकला. दरम्यान पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले.
उपस्थितांनी तात्काळ जलसंपदा विभागाचे धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना या घटनेची कल्पना दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेत कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले.
पाणी कमी झाले. धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा- वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved