अहमदनगर राष्ट्रवादीचा हा नगरसेवक पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुकुंदनगर परिसरातील नगरसेवक समदखान पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे ठाकले आहेत. बेकायदा होर्डिग्ज लावल्याने महापालिकेनेच हा गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक साबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

नगर-औरंगाबाद रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लावलेला फलक हा बेकायदा असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

वाढदिवसाच्या फलकावर समदखान यांचा फोटो होता. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हा फलक लावण्यात आल्याचे चौकशीअंती समोर आले. अधिकृत परवानगी न घेता विना परवाना बेकायदा फलक लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

समदखान वहाब खान ऊर्फ पठाण आणि मोहसीन रफिक शेख, मुजीब अजिज खान (तिघेही रा. मुुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

Entertainment News Updates 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment