‘अशी’ सुरु झाली मदर्स डे साजरी करण्याची पद्धत

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली: संपूर्ण जगात दरवर्षी मे च्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा करण्यात येतो. उद्या 10 मे रोजी मातृदिन आहे. या दिवशी आईचा सन्मान करण्यात येतो.

त्यांच्या प्रति प्रेम , आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. परंतु हा दिवस साजरा करण्याची पद्धत का व कशी सुरु झाली जाणून घेऊयात या विषयी.

1908 मध्ये याची सुरवात झाली. याची सुरुवात वर्जिनिया मधील रहिवासी एनाने केली होती. असं म्हणतात की एनाच्या आईने तिला मोठ्या काळजीने सांभाळलं होत.

तिच्या आईच्या प्रेमामुळे टी प्रभावित झाली होती. याने प्रेरित होऊन एनाने वचन दिले होते की ती कधीही लग्न करणार नाही आणि आईची सेवा करत राहील. त्यावेळी एनाने अमेरिकन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची काळजी घेतली.

तिने जखमींची आई सारखीच सेवा केली. त्यावेळी एनाला तिच्या आईचा सन्मान करण्याची इच्छा होती. ती आसा एक दिवस शोधत होती ज्या दिवशी जगातील सर्व मातांना आदर मिळाला पाहिजे.

त्यानंतर एनाने आईचा सन्मान करण्यासाठी मदर डे सुरू केला. तथापि, अनाचा हा प्रस्ताव अमेरिकन कॉंग्रेसने फेटाळला. यानंतर,

अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 रोजी कायदा मंजूर केला आणि मेच्या प्रत्येक दुसर्‍या रविवारी मदर्स डे करण्याची घोषणा केली. यासंदर्भात आणखी एक कथा आहे,

त्यानुसार ग्रीसमध्ये मदर्स डे ची उत्पत्ती झाली असे म्हटले जाते. ग्रीसचे लोक आपल्या आईचा खूप आदर करतात. म्हणूनच या दिवशी ते त्यांच्या आईची उपासना करायचे, प्रार्थना करायचे.

स्यबेसे ही ग्रीक देवतांची आई होती आणि मदर्स डेच्या दिवशी लोक तिची पूजा करायचे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment