माणुसकीला काळिमा फासणारी घटना : गावी जाण्यासाठी आतुर असणाऱ्या कामगारांची अशी होतेय लूट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यास सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत.

त्यांना अनेक ठिकाणावरून मदतही मिळत आहे. परंतु या दरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या मजुरांना गावी जाण्यासाठी लागणारा अर्ज काळ्या बाजारात विक्री केली जात आहे.

मोफत मिळणारा अर्ज कामगारांना 10 ते 20 रुपयांत दिला जात आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारीच खुलेआम अर्ज विक्री करत आहे.

मेडिकल स्टोअरवरही अर्ज विकले जात आहेत. नवी मुंबईत परप्रांतीय नागरिकांमध्ये संभ्रमाच वातावरण निर्माण झालं आहे. महापालिका प्रशासनामार्फत या नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे.

तर पोलिस प्रशासन मनपाकडे पाठवत आहे. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवण्यात व्यस्त असून यामध्ये नवी मुंबईतील परप्रांतीय नागरिक भरडला जात आहे.

यासोबतच मोफत मिळणार फॉर्मची काही जण 10 ते 20 रुपयांमध्ये विक्री करत आहेत. नागरिकांमध्ये अर्ज कुठून घ्यायचा व तो कुठे भरायचा याबद्दल संभ्रमावस्था असून प्रशासन यामध्ये भर टाकत आहे.

योग्य माहिती मिळत नसल्याने नागरिक विभाग कार्यालय व पोलिस स्टेशनमध्ये गर्दी करत असून यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या या कामगारांना आता प्रशासकीय निष्काळजीपणाचा देखील फटका बसला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment