अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये करोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये करोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे.
या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढविण्या सोबत टेस्ट वाढविण्याचे आदेश पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत
. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते.
मुंबई, पुण्याहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढला. लक्षणे आढळल्यास कोव्हीड हेल्थ केअर सेंटरला जाऊन तपासणी करावी.
जिल्ह्यात संगमनेर तालुक्याचा करोनाचा मृत्यूदर सर्वाधिक नऊ टक्के आहे. सप्टेंबरपर्यंत करोना रूग्ण संख्या कमी होत जाऊन आपण कोरोनमुक्तीकडे वाटचाल करू शकतो असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews