अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : ठाणे येथून आलेली कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलगी आता कोरोनामुक्त झाल्यामुळे तिला घरी सोडले. ७ जूनला तिचा अहवाल पॉजिटीव्ह आला होता.
त्यानंतर तिच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर व वैशाली बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु होते.
उपचारानंतर ती कोरोनामुक्त झाल्याने सोमवारी तिला घरी सोडून देण्यात आले. सध्या तरी कोपरगाव तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews