अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : कोरोनाच्या कहरात आतापर्यत श्रीगोंदा शहर सुरक्षित होते, परंतु राशीन येथील एक नातेवाईक श्रीगोंदा शहरातील साळवन देवी रस्त्यावर मुक्कामी राहिला.
त्याने श्रीगोंदा शहरातील एका दवाखान्यात उपचार घेतले त्यानंतर तो राशीनला गेला आणि त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मग श्रीगोंदयात एकच खळबळ उडाली.
त्याच्या संपर्कात आलेले शहरातील साळवन देवी रस्त्यावरील त्याचे दोन नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वाब घेण्यात आले, त्यातील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे आता श्रीगोंदा शहरातील कोरोना रुग्णाची संख्या आता पाच झाली आहे .
आणि सुरक्षित असणारे श्रीगोंदा शहराला आता कोरोनाचे ग्रहण लागले आहे. आज जे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यातील एक शहरातील एका हॉस्पिटल मधील परीचारीका असून ती अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर येत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews