अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सोनाली ज्ञानदेव शिरसाट ह्या कोरोना निगेटिव्ह झाल्या आहेत.
आता त्या पुन्हा आपल्या कामावर रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कोरोना योद्ध म्हणून काम करणाऱ्या सोनाली शिरसाट ह्या मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या.

त्याच्या बरोबर त्यांचे पती राहुल रामदास गर्जे यांना सुद्धा लागण झाली होती. नुकतेच सोनाली शिरसाट कोरोनातून मुक्त झाल्याने त्या पुन्हा लवकरच आपल्या कामावर कार्यरत होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कामगिरी करून कोरोना रुग्णसाठी लागणाऱ्या रुग्णवाहिका उपलब्ध करून जास्त पैसे घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
कोविड सेंटरसाठी लागणारी वाहन सेवा सुरळीत ठेवण्याचा काम त्यांनी केले आहे. लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरां बरोबर इतर प्रवाशांना लागणारे वाहनांची व्यवस्था करणे,मालवाहतूक गाड्यांना परवानगी देणे,
जिल्हाबंदी असतांना अवैद्य रित्या होणारी वाहतूक त्यावर मोठ्या प्रमाणावर अंकुश लावत कारवाई केली आहे.त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांनी मोठ्या धैर्याने कोरोना आजारावर मात करत पुन्हा एकदा उभारी घेतली आहे.
सोनाली शिरसाट ह्या पाथर्डी तालुक्यातील असून त्या गेल्या 1 वर्षांपासून अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्तव्य बजावत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved