‘त्या’ तीन सख्या भावांची आहे संपूर्ण तालुक्यात दहशत ; पोलिसांनी दिला ‘असा’ दणका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अकोले तालुक्यात दहशत माजविणाऱ्या व अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तीन सख्या भावांची टोळी तालुक्यासाठी डोकेदुखी ठरली होती.

राजूरमध्ये या तिघा भावांची मोठी दहशत होती. अवैध दारू विक्रीच्या व्यावसायातून त्यांनी आपले बस्तान बसविले आहे. पोलिसांनी या तीन सख्या भावांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.

टोळीचा प्रमुख संजय अदालतनाथ शुक्ला (वय ३०) याच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत. राहुल अदालतनाथ शुक्ला (वय २५) याच्याविरुद्धही नऊ गुन्हे आहेत.

विनय अदालतनाथ शुक्ला याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे तिघे भाऊ अकोले तालुक्यात विशेषत: राजूरमध्ये अनेक गंभीर गुन्हे करीत होते.

त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई केली, तरीही त्यांचा उपद्रव सुरूच होता. मारीमारी करणे, गर्दी जमवून दहशत निर्माण करणे,

सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे, अवैधरित्या दारूचा व्यावसाय करणे, चोरी करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे गुन्हे त्यांच्यविरुद्ध दाखल आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment