लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ, कला केंद्र सुरू करण्यास परवानगी द्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेली राज्यातील सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, 

अशी मागणी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य व सांस्कृतिक थिएटर मालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील सर्व कला केंद्र बंद असल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने मॉल, मंगलकार्यालये व इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या प्रमाणे परवानगी दिली.

त्याच प्रमाणे राज्यातील सर्व कला केंद्रे सुरू करण्यास लवकरात लवकर परवानगी द्यावी. अ अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे राज लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र येथे केंद्र चालकांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ कचरे (बार्शी),

ऍड. डॉ. अरुण जाधव (जामखेड), प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, उपाध्यक्ष गोकुळ वैष्णव, सरचिटणीस चंद्रकांत मंडगे, कोषाध्यक्ष किसनराव जाधव, सदस्य मंदाबाई चंदन, मंगल देशमुख, जगन्नाथ घाडगेसह आदी कलाकेंद्र चालक उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment