आज ७७ रूग्णांना डिस्चार्ज तर १०३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात आज ७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ७०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०५९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६ आणि अँटीजेन चाचणीत ३१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०३, पारनेर ०७, राहाता ०४, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पारनेर ०५, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०१, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१,श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३१ जण बाधित आढळुन आले.

मनपा ०२, जामखेड ०५, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, राहाता ०५, राहुरी ०३, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ०३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०३, पारनेर ०४, पाथर्डी ०६, राहाता २२, संगमनेर ०८, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:७०७०१

उपचार सुरू असलेले रूग्ण: १०५९

मृत्यू:११०८

एकूण रूग्ण संख्या:७२८६८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझेकुटुंब_माझीजबाबदारी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment