अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :-राज्यात आज कोरोना बाधित ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ९९१५ झाली आहे.
आज २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार १५९ नमुन्यांपैकी १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ८१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत.
या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.
या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ६६४४ (२७०)
ठाणे: ४६ (२)
ठाणे मनपा: ३७३ (४)
नवी मुंबई मनपा: १६२ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १५८ (३)
उल्हासनगर मनपा: ३
भिवंडी निजामपूर मनपा: १५
मीरा भाईंदर मनपा: १२५ (२)
पालघर: ४१ (१)
वसई विरार मनपा: १२८ (३)
रायगड: २३
पनवेल मनपा: ४६ (२)
ठाणे मंडळ एकूण: ७७६४ (२९०)
नाशिक: ५
नाशिक मनपा: १९
मालेगाव मनपा: १७१ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: ३० (८)
जळगाव मनपा: १० (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: ३१३ (२७)
पुणे:५८ (३)
पुणे मनपा: १०६२ (७९)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: ७८ (६)
सातारा: ३२ (२)
पुणे मंडळ एकूण: १३०९ (९३)
कोल्हापूर: ७
कोल्हापूर मनपा: ५
सांगली: २८
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: २
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५१ (२)
औरंगाबाद:२
औरंगाबाद मनपा: १०३ (७६)
जालना: २
हिंगोली: १५
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: १२३ (७)
लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३
लातूर मंडळ एकूण: १९ (१)
अकोला: १२ (१)
अकोला मनपा: २७
अमरावती: २
अमरावती मनपा: २६ (७)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: १६९ (९)
नागपूर: ६
नागपूर मनपा: १३२ (१)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १४२ (१)
इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ९९१५ (४३२)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ९८११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४०.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®