अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील खिरविरे येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
दि. 4 ऑगस्ट 2020 ते दि. 6 ऑगस्ट 2020 दरम्यान देवा सुभाष सदगीर, सुनीता सखाराम बेनके व अनिल (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. खिरविरे) यांनी अल्पवयीन फिर्यादी मुलीला तिचे मोटारसायकलवरून जात असताना.

अपहरण करून भैरुनाथाच्या मंदिराजवळ तसेच शहापूर, कल्याण येथे नेऊन आरोपी देवा सुभाष सदगीर याने तिच्यावर बळजबरीने वारंवार शारिरीक अत्याचार केला.
व कुणाला काही सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी दिली. आरोपी सुनीता सखाराम बेनके व अनिल पूर्ण नाव माहीत नाही यांनी आरोपीस अपहरण करण्यास मदत केली.
या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved