अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून ‘त्या’ मुलीला मारण्याचा प्रयत्न !

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  शाळकरी मुलीवर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेत पोलिसांचा अनैतिक प्रकरणाचा संशय खरा ठरला. मुलीच्या चुलत्यास रविवारी अटक करून पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

आपले अनैतिक संबंध उघड होऊ नयेत, म्हणून मुलीला संपवण्याचा प्रयत्न तिच्या चुलत्यानेच केला. गिडेगाव येथे २७ जूनला सहावीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वार करण्यात आले.

मुलीने दिलेल्या जबाबात म्हटले होते, वडील, आई, चुलती मजुरीच्या कामावर गेले. साडेबारा वाजता चुलतेही कामावर गेले. भाऊ चुलत्यांच्या घरी खेळायला गेला,

तर चुलत बहीण गवत आणण्यासाठी शेतात गेल्यावर फरशी पुसत असताना अचानक एका व्यक्तीने घरात येऊन चाकूने वार केले. उजव्या व डाव्या हातावर, तसेच तोंडावर, ओठावरही वार केले.

तिने प्रतिकार करत त्याच्या हाताचा चावा घेतला, तेव्हा त्याने तिला सोडले. थोडा वेळाने चुलत बहीण घरी आल्यानंतर वडील व चुलत्यांनी तिला नेवासेफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. नंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तिच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,घरातील वादातून हे प्रकरण उद््भवले असावे, हा पोलिसांचा संशय खरा ठरला. अखेर रविवारी अटक चुलत्याला अटक करण्यात आली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News