Tulsi Gabbard : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमिरिकेत गेले आहेत आणि त्यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी पोहोचताच एका महिलेची घेतलेली भेट आता चर्चेचा विषय बनला आहे.अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नेशनल इंटेलिजेंस पदावर तुलसी गबार्ड यांची नुकतीच निवड झाली असून, शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत भारत-अमेरिका संबंधांच्या विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी देखील गबार्ड यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत भारत-अमेरिका मैत्रीबाबत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक
गबार्ड यांनी बुधवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदाची शपथ घेतली. त्यांनी देशाच्या सर्वोच्च गुप्तचर पदासाठी सिनेटचे मतदान जिंकले, जिथे त्यांना 52 मते मिळाली. रिपब्लिकन सिनेटर मिच मॅककॉनेल हे एकमेव होते, ज्यांनी डेमोक्रॅट्ससोबत गबार्ड यांच्या विरोधात मतदान केले. शपथविधीच्या काही तासांनंतर, पंतप्रधान मोदी आणि तुलसी गबार्ड यांची भेट झाली. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या नियुक्तीचे अभिनंदन करत, भारत-अमेरिका संबंधांच्या दृढतेबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली.
तुलसी गबार्ड कोण आहेत?
तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत आणि त्या अमेरिकेतील हिंदू समुदायाच्या पहिल्या खासदारांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म हवाईमध्ये झाला असून, त्या भारतीय वंशाच्या नाहीत. त्यांच्या आईने हिंदू धर्म स्वीकारला आणि तुलसी गबार्ड यांना हिंदू संस्कृतीत वाढवले. त्यामुळे त्या स्वतःला हिंदू म्हणवतात. गबार्ड यांनी इराक आणि कुवेतमध्येही सैन्य सेवेत काम केले आहे. त्या अमेरिकेतील हिंदूंच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवत आल्या आहेत.
गबार्ड यांची राजकीय कारकीर्द
तुलसी गबार्ड या 2013 ते 2021 पर्यंत हवाईच्या डेमोक्रॅटिक काँग्रेसवुमन होत्या. त्या हाऊस इंटेलिजन्स उपसमिती आणि सशस्त्र दल समितीवरही काम करत होत्या. सुरुवातीला त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्य होत्या, परंतु नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करण्यास सुरुवात केली.
त्यांच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदावर नियुक्तीबाबत काही डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन खासदारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया होत्या. मात्र, राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना ही मोठी जबाबदारी दिली. शपथविधीनंतर गबार्ड यांनी अमेरिकेच्या गुप्तचर समुदायावर नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे वचन दिले.
राजकीय हेतूंसाठी गुप्तचर विभागाचा वापर
गबार्ड यांनी शपथविधीवेळी असे म्हटले की, अमेरिकन नागरिकांचा गुप्तचर संस्थांवर विश्वास उरलेला नाही.अनेकदा राजकीय हेतूंसाठी गुप्तचर विभागाचा वापर केला जातो, हे चुकीचे असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणांचे कार्य पारदर्शक असले पाहिजे.
भारत-अमेरिका संबंधांमध्ये गबार्ड यांची भूमिका
तुलसी गबार्ड या भारतीय संस्कृती आणि भारत-अमेरिका मैत्रीसंबंधांच्या मोठ्या समर्थक आहेत. त्यांनी अनेक वेळा भारताच्या धोरणांचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता आहे.
गबार्ड यांचे भविष्यातील आव्हाने
गुप्तचर विभागाच्या संचालक या पदावर काम करताना, गबार्ड यांना अनेक सुरक्षा विषयक आणि आंतरराष्ट्रीय धोरणांशी संबंधित मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत. त्या रशिया, चीन, आणि मध्यपूर्वेतील धोरणांवर गुप्तचर विभागाच्या भूमिकेला महत्त्व देतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अमेरिकेतील हिंदूंचा आवाज आणि धोरणांवर प्रभाव
गबार्ड यांनी अमेरिकेत हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीबाबत जनजागृती केली असून, त्यांचा प्रभाव वाढत आहे. त्यांच्या गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्तीमुळे, अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर आणि भारत-अमेरिका संबंधांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.