पुणे : हडपसरमधील अमनोरा टाउनशिप शेजारील रस्त्यावर दुचाकीला भरधाव कारची धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात अमनोरा टाउनशिपशेजारी सिव्हिक केंद्रासमोर गुरुवारी (दि. १४ नोव्हेंबर) सकाळी साडेनऊ वाजता झाला. कारचालकाला अटक केली असून, त्याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
बालाजी विठ्ठल कांबळे (वय २०), यश महादेव मोरे (वय १५, दोघे रा. साडेसतरा नळी रोड, हडपसर) अशी अपघतात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.