अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : राहुरी तालुक्यातील केसापूर व देवळाली प्रवरा येथे दोन कोरोना रूग्ण शुक्रवारी आढळले. त्यामुळे एकूण संख्या सहा झाली. यापूर्वी आलेले दोन पाहुणे कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईला विवाहासाठी गेलेला केसापुरातील युवक बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने गावातील रूग्णांची संख्या चार झाली. देवळालीप्रवरा येथे शिर्डीहून आलेला महावितरणचा वरिष्ठ अधिकारी बाधीत असल्याचे निदान झाले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/06/University-of-Nebraska-Medical-Center-to-Conduct-Clinical-Trial-Treating-Coronavirus.jpg)
गेले तीन महिने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव नव्हता. लाॅकडाऊन शिथिल होताच कोरोना छुप्या मार्गाने आला. केसापूर येथील रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला,त्या आठ व्यक्तींना कृषी विद्यापीठातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
केसापूर आणि परिसरातील ताब्यात घेण्यात आलेल्यांची एकूण संख्या ५८ पेक्षा जास्त झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हार-बेलापूर रस्ता प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews