पुणे – नाशिक महामार्गावर अपघातात दोघे ठार

Published on -

संगमनेर – तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला कर्जुले पठार शिवारात झालेल्या अपघातात नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील दोन कर्मचारी जागीच मृत्यू झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले. 

याबाबत सविस्तर घटना क्रम असा कि, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहा कर्मचारी जुना आग्रा रोड त्रंबक नाका येथून शासकीय टेम्पो ( एमएच. 15 एबी. 59 ) मधून पुण्यातील येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी आणण्यासाठी सकाळी निघाले होते. चालक डी. टी. देवरे टेम्पो चालवित होते.

संगमनेर तालुका हद्दीतील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर कर्जुले पठार शिवारात एका वाहनाने त्यांच्या टेम्पोला हुल दिली. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. टेम्पोच्या मागे बसलेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. यात अनिल सोपान कोळी व जगन्नाथ पोपट सणधन (दोन्ही राहणार नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe