संगमनेर : संगमनेर-कोपरगाव रस्त्यावरील रांजणगाव देशमुख (ता. कोपरगाव) शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन युवक ठार झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला.
योगेश माधव जोंधळे (२९, कौठेकमळेश्वर) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी रांजणगाव देशमुख-भागवतवाडी शिवारात ही घटना घडली.
जोंधळे व शुभम संजय पवार (रांजणगाव देशमुख) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १५ बीझेड १६९७) तळेगाव दिघेच्या दिशेने प्रवास करत होते.
त्याचवेळी साहेबराव कारभारी चव्हाण व योगेश आनंदा चव्हाण (रांजणगाव देशमुख) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १७ एडब्ल्यू ९८७९ ) रांजणगावच्या दिशेने येत होते.
दोन्ही दुचाकींची धडक होऊन डोक्याला मार लागून जोंधळे ठार झाला. योगेश जखमी झाला. जोंधळेच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.