वृत्तसंस्था :- उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला.उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झाले होते.
Unnao rape and kidnapping case: The court has acquitted another accused Shashi Singh. https://t.co/gMTNMBbOtP
— ANI (@ANI) December 16, 2019
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. हा बलात्कार भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेनगर केल्याचा आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणी पोलिसांकडे सर्व पुरावे होते. मात्र, अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते.
उन्नावमधील ही बलात्काराची घटना 2017मध्ये घडली होती. या प्रकरणाची सुनावणी या वर्षी पाच ऑगस्टपासून दररोज घेण्यात येत होती. मुळात हा खटला लखनौमध्ये दाखल करण्यात आला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला दिल्लीला वर्ग करण्यात आला. न्यायालयाने आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) दिरंगाई केल्याबद्दल फटकारले आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे जामिनावर तुरूंगातून बाहेर नराधमांनी पीडितेला 5 डिसेंबरला सकाळी जिवंत पेटवले होते. पीडिता 90 टक्के भाजली होती तिची प्रकृती चिंताजनक होती अखेर तिचा मृत्यू झाला होता. तिला तातडीने उपचारासाठी लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले होतं. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली.
बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला. सेंगरने २०१७ मध्ये एका युवतीचे अपहरण केल्यानंतर कुलदीप सेंगरने पीडितेने बलात्कार केला होता.त्याशिवाय पाचवी एफआयआर यावर्षी २८ जुलै रोजी साक्ष देण्यासाठी पीडिता अलाहबाद कोर्टात जात असताना रायबरेलीमध्ये तिचा अपघात झाला होता. या अपघातात पीडितेच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला होता. अपघातात पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते.