जनावरांचे लाळ खुरकत लसीकरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात पंचायत समितीमार्फत जनावरांची संसर्गजन्य लाळ, खुरकत व सांसर्गिक गर्भपात नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम सुरू केल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

याबाबत तहसील कार्यालयात तालुकास्तर समितीची बैठक झाली. यावेळी निकम, पं. स. सदस्य विष्णूपंत रहाटळ, डॉ. जे. के. टिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. पोखरकर,

डॉ. नितीन जोंधळे, डॉ. सुनील शिधोरे, डॉ. वर्षा शिंदे, डॉ. रवींद्र घोडके उपस्थित होते. जनावरांना टॅग न मारणे व नंतर काढून टाकलेल्या जनावरांना बाजार समितीत खरेदी-विक्रीसाठी बंदी घालण्यात येणार आहे.

पशुप्रदर्शन व कर्ज प्रकरणातूनही ही जनावरे वगळण्यात येतील, असे निकम यांनी सांगितले. डॉ. पोखरकर म्हणाले, २४ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मंगळावरपासून लाळ खुरकूत लसीकरण सुरु केले आहे.

तालुक्यात १ लाख ९२ हजार २०२ पशुधन आहे. २४ पशुवैद्यकीय संस्थांमार्फत लसीकरण कार्यक्रम १५ सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment