विधानसभेचे उपसभापती विजय औटींची उमेदवारी अडचणीत?

Published on -

पारनेर – विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना यंदा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात स्पर्धेचा सामना करावा लागणार असल्याचे दिसत आहे. मतदारसंघ विकास कामे केली असली तरी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे.

त्यात आता शिवसेनेचे माजी नगर तालुकाप्रमुख संदेश कार्ले यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. निलेश लंके यांच्याप्रमाणे कार्ले हे देखील सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देत असल्याने सध्या तरी पक्षपामळीवर कार्ले भाव खाऊन जातील असे चित्र निर्माण झाले आहे.

पारनेर तालुक्‍यात प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढत आहे. त्यामुळे बंडाळी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे लंके यांनी गावन्‌गाव पिंजून काढले आहे.

लंके हे शिवसेनेचे तसेच जुने कार्यकर्ते असल्याने गावपातळीवर असलेले शिवसैनिक आज मितीला त्यांच्याबरोबर आहेत. त्याचा परिणाम शिवसेनेच्या उमेदवारावर होणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार विजय औटी हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

पण यंदा त्यांना उमेदवारीपासून संघर्षाला सुरुवात करावी लागणार आहे. संदेश कार्ले यांनी त्यांची डोकेदुखी वाढविली आहे.

कार्ले देखील जुने निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांचा नगर तालुक्‍यातीलसह पारनेरमध्ये चांगला संपर्क आहे. अर्थात शिवसेना-भाजप युती झाली नाही तर कार्ले हे भाजपचे उमेदवार असू शकतील. नगर व पारनेर अशी मतविभागणी शिवसेनेत होण्याची शक्‍यता औटी यांना न परवडणारी आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे भाजपच्या वाटेवर असून ते देखील योग्य वेळेची वाट पाहत असल्याने त्यांना देखील भाजपकडून उमेदवारी मिळू शकते झावरे किंवा कार्ले या दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास विधानसभेमध्ये तालुक्‍यात भाजप देखील करिश्‍मा करू शकतो, अशी एकंदर परिस्थिती आहे.

राष्ट्रवादीकडून सध्यातरी निलेश लंके यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड हे देखील इच्छुक असून त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सोडले नाही.

शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांची तिरंगी लढत होण्याची शक्‍यता असून राष्ट्रवादीकडून लंके यांना उमेदवारी मिळाल्यास मतविभागणीमध्ये कोण बाजी मारतो. त्यावरच बरेचशे गणित अवलंबून आहेत. पण मताचे विभाजन जर झालं तर ते शिवसेनेचे होणार आहे.

कारण लंके हे यापूर्वी सेनेत होते व कार्ले यांना उमेदवारी मिळाल्यास कार्ले देखील शिवसेनेत होते. अशा वेळेस शिवसेनेतील पूर्वीचे दोघं औटी यांना स्पर्धक असतील व त्याचा फटका त्यांना बसू शकतो. अशावेळेस प्रवरेचा आशीर्वाद कोणाला हे महत्त्वाचं ठरू शकते, त्या उमेदवाराला तालुक्‍यामध्ये फायदा मिळू शकतो असा कयास आहे.

सुजित झावरे इच्छुक आहे. राष्ट्रवादी त्यांनी अद्याप सोडली नाही. तसेच त्यांना मानणारा मोठा गट असून इतर पक्षातील नाराजांनी झावरे यांना मदत केल्यास झावरे यांचे पारडे देखील जड होऊ शकते. कारण झावरे यांची मतविभागणी या निवडणुकीमध्ये होण्याची शक्‍यता कमी आहे.

माधवराव लामखडे हे राष्ट्रवादीकडून उत्सुक जरी असले तरी झावरे यांना उमेदवारी मिळाल्यास ते झावरे यांना मदत करतील असा अंदाज आहे. नुकताच झालेल्या भाजप मुलाखतीमध्ये पारनेरमधून अनेकांनी मुलाखती दिल्या. परंतु यामध्ये चर्चेतील एकही नाव नसल्याने भाजप आयात उमेदवारावर अवलंबून आहे हे स्पष्ट आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे भाजपच्या वाटेवर असून ते देखील योग्य वेळेची वाट पाहत असल्याने त्यांना देखील भाजपकडून उमेदवारी मिळू शकते झावरे किंवा कार्ले या दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास विधानसभेमध्ये तालुक्‍यात भाजप देखील करिश्‍मा करू शकतो, अशी एकंदर परिस्थिती आहे.

राष्ट्रवादीकडून सध्यातरी निलेश लंके यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड हे देखील इच्छुक असून त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सोडले नाही. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांची तिरंगी लढत होण्याची शक्‍यता असून राष्ट्रवादीकडून लंके यांना उमेदवारी मिळाल्यास मतविभागणीमध्ये कोण बाजी मारतो.

त्यावरच बरेचशे गणित अवलंबून आहेत. पण मताचे विभाजन जर झालं तर ते शिवसेनेचे होणार आहे. कारण लंके हे यापूर्वी सेनेत होते व कार्ले यांना उमेदवारी मिळाल्यास कार्ले देखील शिवसेनेत होते.

अशा वेळेस शिवसेनेतील पूर्वीचे दोघं औटी यांना स्पर्धक असतील व त्याचा फटका त्यांना बसू शकतो. अशावेळेस प्रवरेचा आशीर्वाद कोणाला हे महत्त्वाचं ठरू शकते, त्या उमेदवाराला तालुक्‍यामध्ये फायदा मिळू शकतो असा कयास आहे.

सुजित झावरे इच्छुक आहे. राष्ट्रवादी त्यांनी अद्याप सोडली नाही. तसेच त्यांना मानणारा मोठा गट असून इतर पक्षातील नाराजांनी झावरे यांना मदत केल्यास झावरे यांचे पारडे देखील जड होऊ शकते. कारण झावरे यांची मतविभागणी या निवडणुकीमध्ये होण्याची शक्‍यता कमी आहे.

माधवराव लामखडे हे राष्ट्रवादीकडून उत्सुक जरी असले तरी झावरे यांना उमेदवारी मिळाल्यास ते झावरे यांना मदत करतील असा अंदाज आहे. नुकताच झालेल्या भाजप मुलाखतीमध्ये पारनेरमधून अनेकांनी मुलाखती दिल्या. परंतु यामध्ये चर्चेतील एकही नाव नसल्याने भाजप आयात उमेदवारावर अवलंबून आहे हे स्पष्ट आहे.

विखेंच्या मर्जीतील उमेदवार होणार आमदार

भाजपमध्ये ना. विखे गटाची महत्वाची भूमिका राहणार असून जिल्ह्याचे राजकारण हातात घेतलेले विखे राज्यात आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी व पारनेरमध्ये विखे यांचा मोठा गट असल्याने पारनेरमधून देखील आपल्याला भविष्यात मदत होईल, अशा उमेदवारा सोबत आपली ताकद उभी करू शकतात. त्यामुळे त्यांच्या मनातील उमेदवार कोण हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल व त्यालाच ते विधानसभा निवडणुकीमध्ये मदत करतील.

दुरंगी लढतीमध्ये औटींचे काम वाढणार

विधानसभेसाठी अनेक मातब्बर रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी निश्‍चित मानली जात असली तरी भाजप-सेना युतीबाबत अनिश्‍चितता आहे. यामुळे पारनेरमधून भाजपकडून देखील उमेदवारीसाठी अनेकजण इच्छूक आहेत.

तालुक्‍यातून तिरंगी चौरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा सत्तेवर असणाऱ्यांना होण्याची शक्‍यता जास्त असून दुरंगी लढतीत तोटा होऊ शकतो. प्रवरेचा आशीर्वाद कुणाला हे देखील महत्त्वाची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe