पुत्र कि पक्ष ? ना.विखे आणि खा. गांधींच्या पक्षनिष्ठेबाबत चर्चा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- पुत्रप्रेमाला किती महत्त्व असते याचे उत्तम उदाहरण बुधवारी रात्री पहायला मिळाले.

विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे यांनी रात्री उशिरा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला न सोडल्याने डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली.

त्यांचे वडील राधाकृष्ण विखे अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव आहे.

असे असताना पुत्रप्रेमापोटी ते भाजप खासदार गांधी यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यामुळे विखे यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, खासदार गांधी यांनीदेखील मी भाजपचेच काम करणार असल्याचे सांगितले असले, तरी ते अद्याप भाजप उमेदवाराच्या कोणत्याच प्रचार मेळाव्यात किंवा बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत.

उलट त्यांचे पुत्र सुवेंद्र यांनी डॉ. विखे यांच्या विरोधात उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे खासदार गांधी यांच्या पक्षनिष्ठेबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment