संकटमोचन मारुतीरायाच्या दर्शनासाठी विखे पाटील पोहचले मंदिरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून जगभर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यातच महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालेला आढळून आला.

खबरदारी म्हूणन राज्य शासनाने राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवली होती. दरम्यान नुकतीच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मंदिरे खुली केली आहे.

यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन घेण्याचा लाभ घेतला आहे. विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी येथील हनुमान मंदिरात जाऊन ग्रामस्थांसमवेत दर्शन घेतले.

कोरोनाचं संकट संपूर्ण जगातून नष्ठ होण्यासाठी विखे पाटलांनी मारुतीरायाला साकडं घातलं आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे बंद झालेली मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले.

राज्यसरकारने याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारपासून मंदिर उघडण्यास परवानगी मिळाली. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लोणी येथील हनुमान मंदीरात जाऊन ग्रामस्थांसमवेत दर्शन घेतले

व लवकरात लवकर सर्व पूर्ववत होण्यासाठी साकडे घातले.विखे पाटील यांनी मंदिरात दर्शन घेताना मास्क परिधान करण्याचा नियम पाळून इतरांसमोर उदाहरणही ठेवलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment