अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-तालुक्याच्या पूर्व भागात सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे आढळगाव च्या सरपंच पदी माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थक शिवप्रसाद उबाळे यांची सरपंच पदी निवड झाली तर उपसरपंच पदी खा.सुजय विखे-पाटील यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य अनुराधा ठवाळ यांची निवड झाल्यामुळे आढळगावात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप मध्ये युती झाली आहे
श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठे गाव म्हणून आढळगाव ची ओळख आहे या गावच्या ग्रामपंचायती च्या निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागला होता
यात आ . बबनराव पाचपुते यांचे समर्थक उत्तम राऊत यांच्या पॅनल ला सहा जागा मिळाल्या होत्या व माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाच्या शिवप्रसाद उबाळे यांच्या गटाला ४जागा मिळाल्या व माजी जिल्हा परिषद सदश्य अनिल टवाळ यांच्या गटाला २ जागा व मूळचे भाजप चेच व माजी खा दिलीप गांधी यांचे समर्थक व
गेल्या १० वर्षात पती व पत्नी सरपंच म्हणून राहिलेले देवराव वाकडे यांच्या पॅनल ला फक्त एकच जागा मिळाली होती पण निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीचे राजकारण झाले यात पाचपुते समर्थक जिजाराम डोके यांची भूमिका महत्वाची ठरली डोके यांचा पराभव राऊत यांनी केल्यामुळे पराभवाचा बदला घेण्यासाठी डोके यांनी
“सो धा”राजकारणाचा मंत्र अजमावला व राऊत यांच्या पॅनल मधून निवडून आलेल्या आपल्या नातेवाईकाला उबाळे यांच्या गटाच्या गळाला लावण्यात यश आले त्यात माजी सरपंच देवराव वाकडे यांची भूमिका महत्वाची ठरली त्यांनी उबाळे यांना साथ देण्याचे निकाल लागल्यापासून ठरवले होते वाकडे स्वतः व पत्नी सरपंच असताना उबाळे यांनी काही गोष्टीत मदत केली
असल्यामुळे वाकडे यांनी आजच्या निवडीत उबाळे यांना साथ दिली त्यामुळे आढळगाव च्या राजकारणात राष्ट्रवादी व विखे समर्थक भाजप यांची युती झाली आहे
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2021, all rights reserved