प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची गावकऱ्यांकडून हत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान लोकांना घराबाहेर जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.

यादरम्यान एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र ही त्याची प्रेयसीसोबतची शेवटची भेट ठरली आहे.

हे प्रकरण झारखंडची राजधानी रांची येथील आहे. शुक्रवारी सकाळी जेव्हा कुचू गावातील शेतात एका तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबड उडाली.

शेतात काही महिला काही निमित्त शेतात गेल्या होत्या तेथे शेताजवळील एक खड्ड्यात तरुणाचा मृतदेह पाहिल्यानंतर महिलांचा भीतीने थरकाप उडाला.

महिलांनी लागलीच गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जात हा मृतदेह ताब्यात घेतला. मृत झालेल्या तरुणाचे नाव मनोज असं आहे.

सांगितले जात आहे की, मनोज आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता.

मात्र तरुणीच्या कुटुंबीयांना याबाबत संशय आला. यानंतर कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने मनोजची अत्यंत निघृणपणे हत्या केली.

मनोजची हत्या गळा कापून करण्यात आली. या हत्येमध्ये कोण कोण सहभागी होतं याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment