दिल्ली :- लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक पिवळ्या साडीतील मतदान अधिकारी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.अखेर आता तिचे खरे नाव आणि ओळख पटली आहे.

या महिलेचे नाव रीना द्विदेवी असून त्या लखनऊ येथील पीडब्ल्युडी विभागात कार्यरत आहेत. लखनऊपासून ४० किमी अंतरावर असलेल्या नगराम मतदान केंद्र १७३ येथे त्यांची नियुक्ती झाली होती.

‘बिग बॉस’ रियलिटी शोमध्ये जायचेय !
रीना म्हणाली की तिला निमंत्रण मिळाल्यास ‘बिग बॉस’ रियलिटी शोमध्ये भाग घेण्यास ती आवडेल. रीना म्हणाली, “माझे कुटुंब नेहमी माझ्यासोबत उभे राहिले आहेत आणि मला मिळालेल्या ओळखीमुळे त्यांना खूप आनंद झाला आहे.” संधी मिळल्यास, ‘बिग बॉस’ एक सुवर्ण संधी असेल.

गुगलवर सर्च मध्ये आघाडीवर
काही प्रसिद्धी माध्यमांनी ही महिला नलिनी सिंह असल्याचा दावा केला होता. मिस जयपूर किताब त्यांच्या नावे असल्याचेही म्हटले होते. त्यांनंतर गेले काही दिवस रिना द्विदेवी आणि नलिनी सिंह ही दोन नावे गुगलवर सर्च करण्यात आली आहेत.
पिवळ्या साडीतील ही महिला कोण….
गुगल ट्रेंडवर पिवळ्या साडीतील ही महिला कोण आहे ?, असे बऱ्याचजणांनी सर्च केले आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी सर्वात जास्त जणांनी याबाबत सर्च केले आहे.

परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर सर्च
नलिनी सिंह यांचे नाव परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आले आहे. गुगल ट्रेंडमध्ये जागतिक डाटानुसार, या महिलेला नलिनी सिंह या नावाने त्रिनिदाद एंड टोबैगो, हंगरी न्यूजीलॅड, जर्मनी, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, स्विट्जरलॅड, सिंगापुर, चिली, स्पेन, फिलीपींस, मलेशिया, पोलैंड आदी देशातूनही सर्च करण्यात आले आहे.

मुलाखत घेण्यासाठी रिना यांना सतत फोन
रीना आता एवढ्या प्रसिद्ध झाल्या की लोक त्यांच्याजवळ येऊन सेल्फी काढण्याची विनंती करतात. तसेच अनेकजण त्यांची मुलाखत घेण्यासाठी रिना यांना सतत फोन करत असतात. सोशल मीडियामधूनही अनेकजण शूट करतात.
२०१३ मध्ये प्रदीर्घ आजाराने पतीचे निधन
रिना यांचं लग्न २००४ मध्ये पीडब्ल्यूडी विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संजय द्विवेदी यांच्याशी झालं होतं. पण २०१३ मध्ये प्रदीर्घ आजाराने संजय यांचं निधन झालं. रिना यांच्या प्रसिद्धीचा फायदा सध्या त्यांच्या कुटुंबियांनाही मिळत आहे.

वास्तवात ७० टक्केच मतदान …
मोहनलालगंज येथील नगराम मतदान केंद्रावर ड्यूटी करताना त्यांच्या बूथवर ७० टक्के मतदान झालं होतं. रिना यांनी हेही सांगितलं होतं की, व्हायरल झालेल्या बातमीत त्यांच्या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण वास्तवात ७० टक्केच मतदान झालं होतं.