VRDE प्रश्नी आमदार लंके संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशाच्या स्वातंत्र्यानंतर नगर येथे स्थापन झालेल्या VRDE या संस्थेच्या देशभरात सध्या 52 शाखा आहेत. या संस्थेने आजवर देशासाठी अनेक उपयुक्त संशोधने केलेली असून नगरच्या संस्थेची देशासह जगभरात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.

नगर जिल्ह्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू असून त्यास आपला ठाम विरोध आहे.

कोणत्याही परिस्थितीत ही संस्था येथून हालवू देणार नाही अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

तसेच खा. पवार यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवरकच या प्रश्नी संरक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे लंके यांनी सांगितले.

दरम्यान संरक्षण विभागासाठी आवष्यक असलेली वाहने तसेच अन्यसामग्रीही विकसित करण्यात नगरच्या व्हिआरडीईचा मोलाचा वाटा आहे.

नगरची ही संस्था हालविण्यामागचे कारण काय असा सवाल करून आ. लंके यांनी ही संस्था इतरत्र हालविण्यास आपला ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशाच्या संरक्षण विभागात या संस्थेचे महत्वपूर्ण स्थान असून शहर व परिसराच्या विकासात या संस्थेचे मोठे योगदान आहे.लष्कराचा महत्वपूर्ण मोठा तळ नगरमध्ये आहे. त्यासाठी ही संस्था नगर येथेचे असणे व्यवहारीकदृष्टया योग्य आहे, असे लंके म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!