अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : प्रशासकीय यंत्रणेबरोबर असहकार पुकारणाऱ्या सुपे येथील निरायम हॉस्पिटलचे डॉ. विजय जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी दिला.
डॉ. जगताप त्यांच्या रूग्णालयात दाखल ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मृत्यूनंतर लक्षात आल्यानंतर संपूर्ण सुपे गाव सील करण्यात आले आहे.
महिलेत कोरोनासदृश लक्षणे असल्याचे त्यांनी तहसीलदार किंवा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना न कळवता परस्पर या महिलेस नगरच्या खासगी रूग्णालयात दाखल केले.
कोरोनाचे उपचार न मिळाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. शासनाने वेळोवळी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वीच डॉ. जगताप यांच्यावर सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. जगताप यांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला, तसेच डॉक्टरसह महिलेच्या संपर्कात अनेक नागरिक आल्याने सुपे गाव सील करण्यात आले.
जगताप यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे कोरोना संशयितांची शासकिय वैद्यकीय अधिकारी तपासणी व उपचार करत आहेत,
परंतु या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी डॉ. जगताप यांनी असहकार पुकारला असून रूग्णालयाचा पहिला मजला वापरण्यास मज्जाव केला आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उंद्रे यांनी तसा अहवाल तहसीलदार देवरे यांना दिला असून जगताप यांनी असाच असहकार पुकारला, तर त्यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देवरे यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews