श्रीगोंदा : तालुक्यातील लोणीव्यंकनाथ रेल्वेगेटजवळील अग्रवाल यांच्या बांधकामावरील वॉचमन संजय बापूराव खोमणे रा.लोणीव्यंकनाथ यांना दि.१५ रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील दोन हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा एकूण २९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
तसेच चोरट्यांनी त्या ठिकाणावरील जेसीबी व ग्रीडर या वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले आहे.सदर चोरीबाबत संजय खोमणे यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, वॉचमन असणारे खोमणे हे १५रोजी लोनिव्यंकनाथ रेल्वेगेटजवळील अग्रवाल यांच्या बांधकामावर असताना,
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी चार अज्ञात चोरटे आले त्यांनी खोमणे यांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याचा धाक दाखवत खोमणे यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन बळजबरीने चोरला. तेथील उभ्या असलेल्या वाहनांचे देखील नुकसान केले.