लॉकडाऊनच्या काळात आम्हाला हवी मदतीची साथ

Published on -

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनमुळे यात्रा-जत्रांमधील मनोरंजनाचे विविध कार्यक्रम यंदा रद्द झाल्यामुळे लग्न सराईही पुर्णपणे बंद असल्याने लग्नसराईतील ऑक्रेस्ट्रा गाणी व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंदी आल्याने कलावंतांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

या कलावंतांना आता मदतीचा राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी ही पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे असल्याची भावना प्रवरासंगम येथील ऑक्रेस्ट्रा गायिका मुमताज शेख यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या यात्रा, जत्रा, उरुस व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. भारूड, जागरण गोंधळ या कलावंतांसमोरही मोठ्या अर्थिक अडचणीचा पेच प्रसंग आलेला आहे.

चार महिने मनोरंजन करून मिळणार्‍या बिदागीत वर्षभर प्रपंचाचा गाडा चालविण्याचे काम कलाकार मंडळी करत असतात. मात्र, कोरोनामुळे या संचारबंदीत कलाकारांना घरीच थांबून सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याने

कलाकारांची उपासमार झालेली असल्याचे मुमताज शेख यांनी सांगून कलाकारांना यावेळी मदतीची नितांत गरज आसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगत सामाजिक संघटना व शासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना सांगितले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe