अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदाची दिशाभूल करत, सह्यांचा गैरवापर करून स्वत:च्या फायद्यासाठी पतसंस्थेची बदनामी केली आहे.
याबाबत आमची कुठलीही तक्रार नाही असे आशयाचे निवदेन ५२ सभासदांनी सह्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील व जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहे.
सभासंदाची पतसंस्था ही कामधेनू आहे. या संस्थेच्या माध्यमातून आमच्या संसाराला हातभार लागून आमची आर्थिक उन्नती झाली आहे. वेळोवेळी पतसंस्थेने आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी , लग्नासाठी व आजारासाठी अर्थसाह्य केलेला आहे. आमच्यापैकी काही सभासदांचा वस्तू कर्जाशी कुठल्याही
प्रकारचा संबंध नसतांना निवेदनावर फसवणूक सह्या घेण्यात आल्या व आमच्या परस्पर खोट्या सह्या करण्यात आलेल्या आहेत. तरी आमच्यापैकी काही सभासदांनी तोफखाना पोलिस स्टेशन येथे काही दिवसापूर्वी संमक्ष उपस्थित राहून आमचे म्हणणे खुलासा संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
वास्तविक पाहता आम्ही आमचे अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी संस्थेकडून आमच्या मर्जीनुसार वस्तू कर्ज घेतले असून त्यात कुठलीही फसवणूक झालेली नाही आम्ही नेमाप्रमाणे कर्ज घेतले असून त्याची परतफेडही करत आहोत
तरी महानगर पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी आमची दिशाभूल करून खोटे सांगून कर्ज माफ करतो असे आमिष दाखवून काही सभासदांनी पूर्वी आमच्या सह्या घेतल्या होत्या तरी आमची संस्थेच्या विरोधात व आम्ही घेतलेल्या
वस्तू संबंधीत दुकादारांविषयी आमची कुठलीही तक्रार नाही. आमचे संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजर, संचालक मंडळांनी कुठलीही फसवणूक करत नाही व केली नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved