अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पतीपत्नीस विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे.
जर याबाबत तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करून पीडितेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचा दावाही संबंधितांनी केला आहे. २०१६ मध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला होता. याबाबत तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
या अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने आरोपींना जामीन नाकारले आहेत. पीडित पती-पत्नीला ही फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही महिलेला मारण्याचा प्रयत्न झाला होता. २४ जानेवारीला पीडित पती – पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यावर एका रिक्षात बसले.
परंतु रिक्षात त्यांच्या आधीच एकजण बसलेला होता त्याने या पती पतीपत्नीच्या नाकाला कसलेतरी औषध लावल्याने त्यांना गुंगी आली. त्यानंतर त्यांना अज्ञात स्थळी नेवून एका बंदिस्त रूममध्ये पती-पत्नीचे कपडे काढून विवस्त्र करून त्यांना बांधून मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. ‘फिर्याद मागे घ्या, अन्यथा मारून टाकू,’ अशी धमकी दिली गेली.
मारायचा व्हिडिओ करून जर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली. जर तुम्ही फिर्याद दिली तर तू याठिकाणी आला होता आणि तू दुसऱ्या महिला अत्याचार केला, अशी फिर्याद तुझ्यावर दाखल करेन, अशी धमकी देण्यात आली होती.
पती-पत्नीने आम्ही तुमच्या विरोधात केस दाखल करणार नाही असे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना नगरला आणून सोडले. मारहाण करताना आम्ही पोलिस आहोत असेही ही दोन आरोपी सांगत होते. ‘कोर्टात जाऊ नको असे सांगितले होते. तरीही तू गेला म्हणून तुझेही हाल केले. आता गेला तर तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देण्यात आल्याचा पीडितांचा आरोप आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com