अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली.
निफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.१५% किंवा ५९.१४ अंकांची घसरण घेतली व ३८,३१०.४९ अंकांवर स्थिरावला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/08/Amar-Singh.jpg)
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११२८ शेअर्स घसरले, १५६४ शेअर्सनी वृद्धी घेतली तर १३६ शेअर्स स्थिर राहिले. आयशर मोटर्स (२.०६%), सन फार्मा (२.१०%), भारती एअरटेल (२.०४%), एनटीपीसी (१.५८%) आणि एचडीएफसी लाइफ (१.५०) हे निफ्टीवरील टॉप लूझर्स ठरले.
तर टाटा मोटर्स (४.५९%), हिंडाल्को (४.२१%), एलअँडटी (४.३९%), टायटन कंपनी (३.९२%) आणि भारती इन्फ्राटेल (३.७२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. बँकिंग आणि फार्मा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. बीएसई मिडकॅप १.५९% नी तर बीएसई स्मॉलकॅप ०.७६% नी वाढला.
लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड: कंपनीने जूनच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त नफ्याची नोंद केली. परिणामी त्यांच्या शेअर्समध्ये ९.८६% ची वाढ झाली व त्यांनी ३२३० रुपयांवर व्यापार केला.
शॉपर्स स्टॉप लिमिटेड: या रिटेल चेनने वार्षिक निव्वळ तोटा १२०.३ कोटी रुपयांचा नोंदवला. तर महसूलातही ९३.६% ची घट दर्शवली. तरीही कंपनीचे स्टॉक्स ६.४०% नी वाढले व त्यांनी १७५.३० रुपयांवर व्यापार केला.
अरबिंदो फार्मा लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीची कमाई चांगली झाली. कंपनीचे स्टॉक्स ५.६३% नी घसरले व त्यांनी ८८१.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २२.८% नी वाढला तर पहिल्या तिमाहीतील महसूल ८.८% नी वाढला.
कमिन्स इंडिया लिमिटेड: कंपीनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६५% ची घट नोंदवली तर देशांतर्गत विक्रीत ६४% ची घसरण झाल्याचे दर्शवले. तरीही कंपनीचे स्टॉक्स ३.३०% नी वाढले व त्यांनी ४३७.०० रुपयांवर व्यापार केला.
डीबी कॉर्प लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ६५.३% घसरण झाली तसेच ४८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. तरीही कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी व्यापार केला. कंपनीचे स्टॉक्स ३.०४% नी वाढले व त्यांनी ८१.२५ रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: भारतीय रुपयाने देशांतर्गत इक्विटी बाजारातील अस्थिरतेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आजच्या व्यापारी सत्रात ७४.८३ रुपयांचे मूल्य कमावले.
जागतिक बाजार: कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये सतत वाढ आणि अमेरिकेतील महागाईत वाढ झाल्यामुळे आशियाई स्टॉक्समध्ये आजच्या व्यापारी सत्रात वृद्धी दिसून आली. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. नॅसडॅक २.१३% , निक्केई २२५ चे शेअर्स १.७८% नी वाढले.
तर हँगसेंगचे शेअर्स ०.०५% नी घसरले. युरोपियन मार्केटमध्ये घसरणीचा व्यापार दिसून आला. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१६% नी घसरले तर एफटीएसई १०० चे शेअर्स १.११% नी घटले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved