अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनमध्ये अहमदनगरमधील पाथर्डी शहरातील एका कुटुंबाने कोरोनाचे सर्व निर्बंध मोडून चक्क कपड्यांच्या दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता बांधला.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पाथर्डी शहरातील मेनरोडवरील श्रीराम कलेक्शन हे कापडाचे दुकान आहे. दुकानाचा मालक आनंद मारुती फासे याने शेकटे व मोहटे येथील नागरीकांना लग्नाचे कापड व कपडे खरेदीसाठी बोलावून घेतले.
सोमवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास श्रीराम कलेक्शन येथे लग्नाचा बस्ता चालु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुकानावर छापा घातला.
दुकानदार आनंद फासे, कामगार इंद्रजीत टेमकर, संदिप लगारे हे तिघे जण आणि बस्त्यासाठी आलेले शंकर दहीफळे, शिवाजी दहीफळे, शेषराव पालवे, पोपट दहीफळे, जालिंदर दहीफळे, गणेश दहीफळे, राजेंद्र दहीफळे, पप्पु दहीफळे, मंगल दहीफळे (सर्व रा. मोहटे), दत्तात्रय घुले, गहीनीनाथ घुले, बाळु नाथा घुले, राजेंद्र घुले, स्वाती घुले (रा. शेकटे) हे दुकानात आढळले.
प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या गुप्त माहितीव्दारे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर गर्जे, अनिल बडे, जयदत्त बांगर, नारायण कुटे, प्रदीप बोरुडे या पथकाने ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®