अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.
तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. तालुक्यातील लोणी बुद्रुक याठिकाणी कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढू लागले आहे.
येथील रुग्णांची संख्या पाच झाली असून 7 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. लोणी बुद्रुक गावालगत असलेल्या चंद्रापूर गावातील दोघे जण नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी कन्नड येथे गेले होते.
तेथून परतल्यानंतर त्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेऊन त्यांना शिर्डी येथे विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
लोणीतील सात आणि चंद्रापूर येथील दोन व्यक्तींच्या अहवालाकडे दोन्ही गावांतील नागरिकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान , लोणी जवळच्या चंद्रापूर येथील दोघांना लक्षणे आढळून आल्याने सोमवारी त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.
लोणी बुद्रुक येथील व्यापारी व त्यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर पनवेल येथून आलेल्या गावातील एका व्यक्तीच्या पाहुण्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता.
या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कातील 32 व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील एक व्यक्ती बाधित आढळून आल्याने त्यांना प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा