वाईनसोबत बिस्कीट खाताना स्वरा भास्कर झाली ट्रोल, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-स्वरा भास्कर आणि ट्रोल यात नवीन अस काहीच नाही.अनेक मुद्यांवरून ती ट्रोल होत असते. आता ती मात्र एका वेगळ्याच गोष्टीवरून ट्रोल झालीय. फिल्मफेअर अकाऊंटवरून स्वरा भास्करचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

ज्यात ती एक नवीन रेसिपी करताना दिसून येत आहे.लोक ती रेसिपी पाहून तिच्यावर संतापले आहेत.तू वेडी तर नाही झालीस,असे काय काय लोकांनी तिला सुनावले. आता ह्या रेसिपीबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसणार आहे.

स्वरा चक्क वाईनमध्ये बुडवून बिस्कीट खातेय. “मित्रांनो ,हि आहे सर्वात उत्तम ख्रिसमस रेसिपी,’ असे ती व्हिडिओत म्हणत आहे. बिस्कीट अतिशय काळजीपूर्वक वाईनमध्ये बुडवा आणि पटकन खाऊन टाका, असेही ती सांगतेय.

बिस्कीट वाईनमध्ये बुडऊन खाणे आणि ते पण ख्रिसमसच्या सणाला, यामुळे स्वर भास्करला युजर्सच्या ट्रोलचा सामना करावा लागत आहे. तीचा हा व्हिडीओ पाहून सगळेच चकित झालेत.

अनेक युजर्सने स्वराला ट्रोल केले आहे. स्वर भास्कर हिला ट्रोल होण नवीन नाही.तिचा हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क आले आहेत.वाईनमध्ये बिस्कीट बुडवून कोण खात? असा सवाल करत अनेक युजर्सनी तिला त्यानंतर ट्रोल पण केल.

यावर एकाने तिला इसका दिमाग खराब है क्या असाही प्रश्न विचारला आहे.ट्रोलर्सने विचारलेल्या प्रश्नांना स्वरा कसे उत्तर देते हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe