अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील कोरणाची परिस्थिती खूप भयंकर झाली असून कोरोना आजारावरील गंभीर रुग्णांवर आश्वासनांचे त्रास असणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन उपलब्ध होत नसून खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकरिता पन्नास हजार ते एक लाख रुपयांची रक्कम डिपॉझिट घेतल्यानंतरच रुग्णांना दाखल करत असल्यामुळे गरीब सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसून
फक्त श्रीमंतांनाच हे खाजगी रुग्णालयात उपचारा करीत न्याय कोन देणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना उपस्थित केला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व बेड ची माहिती प्रसिद्ध करावी
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत हॉस्पिटल विचार करत असतील त्यांच्यावर कारवाई करावी तसेच हजारो लाखो रुपये डिपॉझिट मागण्याच्या हॉस्पिटल वर कारवाई करावी तसेच वेंटीलेटर ऑक्सिजन बेडची शहरात संख्या वाढवावी, एक लाखांपेक्षा जास्त बिल आकारणीत केलेल्या हॉस्पिटलवर कारवाई करावी,
सरकारी दर पत्रकाप्रमाणे हॉस्पिटलने रुग्णांवर उपचार करावे, शहरात वाढिव बिलांच्या अनेक तक्रार येऊन देखील आजून पर्यंत एकही हॉस्पिटल वर कारवाई झाली नसून याबाबत मनसे आणि जनतेची शंका असून महानगरपालिकेवर संशय निर्माण होत आहे.
त्यामुळे आपण ताबडतोब व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजन बेड उपलब्ध करावे तसेच डिपॉझिट घेणाऱ्या व महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारास टाळाटाळ करणाऱ्या व डिपॉझिट घेणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करावी महत्त्वाचं म्हणजे बेड वाचुन कोणत्याही मृत्यू जाऊ नये या गोष्टीने काळजी घ्या ही कळकळीची विनंती….
अन्यथा जर लाखो रुपये डिपॉझिट घेणारे हॉस्पिटल, महात्मा फुले जण आरोग्यसेवा सेवेत उपचारास टाळाटाळ करणारे हॉस्पिटल वर आपण कारवाई करनार नसाल तर मनसे रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आल्यास संबधित हॉस्पिटल वर धडक देऊन मनसेच्या स्टाईलने चोकशी करू व कारवाई करू
असा ईशार मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिला वरील प्रमाणे सर्व आरोग्य व्यवस्थेबाबत दाखल यावा ही आशा बाळगतो व ताबडतोब लक्ष पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती करतो यावेळी जिल्हा सचिव मनसे अहमदनगर नितीन भुतारेजिल्हा अध्यक्ष मनसे अहमदनगर,सचिन डफळ शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर, अमोल बोरुडे ,तुषार हिरवे, विनोद काकडे, अंबादास गोटीपामुल,अॅड.अनिता दिगे, गणेश शिंदे, उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved