अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीने पतीच्या तोंडात मारली ! राग आल्याने दिराने भावजईचा जीवच घेतला ! दोघांविरोधात खुनाचा गुन्हा

Published on -

Ahmednagar Breaking : घरात किराणा सामान आणण्यासाठी पतीने पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीने पतीच्या तोंडात मारली. याचा राग आल्याने दिराने रागाच्या भरात भावजईच्या डोक्यात लाकडी ढलपी घालून खून केला. याप्रकरणी पतीसह दिराला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.

सौ. सीमा बाळू घोडेस्वार (वय ३५), रा. साकत, असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की, मयत सीमा हिचे १५ वर्षांपूर्वी बाळू अरुण घोडेस्वार याच्या सोबत लग्न झाले होते.

ती सासरी साकत, या ठिकाणी नांदत होती. त्यांना दीक्षा नावाची १३ वर्षांची मुलगी आहे. सीमा सासरी नांदत असताना पती व दीर पैशांसाठी तिचा वारंवार छळ करून मानसिक त्रास देत होते.

रविवार, दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मयत सीमा हिचा पती गावातील एका शाळेत दारू पिऊन बसला होता. घरातील किराणा सामान संपल्याने सीमा व मुलगी पैसे मागण्यासाठी पतीकडे गेले.

मात्र, पतीने पैसे देण्यास नकार देताच मयत सीमा हिने पतीच्या तोंडात एक झापड मारली. या वेळी मयत सीमा हिचा दीरदेखील त्या ठिकाणी होता, त्याने आपल्या भावाच्या तोंडात भावजईने झापड मारलेली पाहिली होती.

सीमा घरी आल्यानंतर तिचा दीर अतुल घोडेस्वार हादेखील घरी आला, त्याने रागाच्या भरात घरातील लाकडी धपली भावजईच्या डोक्यात दोनवेळा घातली. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्याने तिला जामखेड येथील हॉस्पिटल नेण्यात आले.

मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. याप्रकरणी मयत सीमा हिचे वडील राजेंद्र आश्रुबा सरोदे रा. घुमरा. पारगाव. ता. पाटोदा जि. बीड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पती बाळू अरुण घोडेस्वार व दीर अतुल अरुण घोडेस्वार यांच्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News