अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : कोपरगाव मतदारसंघाचा रस्ते विकासाचा प्रश्न गंभीर आहे. अनेक रस्ते नकाशावरच नाहीत. हे रस्ते नकाशावर आल्याशिवाय निधी उपलब्ध होणार नाही.
त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना हे रस्ते नकाशावर घेण्यासाठी विशेष सूचना दिल्या असून त्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कामकाज सुरू केले आहे.
विकासकामे करताना राजकारण बाजूला ठेवत समाजकारण डोळ्यासमोर ठेवून लोकहितवादी विकासकामे करू, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
तालुक्यातील कोकमठाण येथे राज्य मार्ग ३६ ते कारवाडी हद्द रस्त्याचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता बदल झाल्यापासून सर्व सदस्यांनी प्राणपणाने काम केल्याने निधीत भरघोस वाढ झाली आहे.
त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजना, शाळा, खोल्या, दलित वस्ती सुधारणा, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते आदी विकास कामासाठी निधी मिळत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोनाली साबळे, सुधाकर रोहोम, उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, दिलीप सोनकुसळे,
उत्तम पवार, सुदाम लोंढे, विजय रक्ताटे, विजय थोरात, महेश लोंढे, दीपक रोहोम, जालिंदर हाडोळे, आबा रक्ताटे, वैभव घुले, ग्रामसेवक डी. बी. गायकवाड, शिंदे उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews