अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यावर या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर नागपूरचे हिवाळी अधिवेशन या मंत्रिमंडळाने पार पाडले.
या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे सुतोवाच आघाडीच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे आता त्याचे वेध लागले आहेतज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्या जिल्ह्यात त्या पक्षाचा पालकमंत्री असेल, असे महाविकास आघाडीचे सूत्र ठरले असल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्याने पालकमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचा दावा केला जातो. केवळ जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी कोण मंत्री होतात व ते राज्यमंत्री होतात की कॅबिनेट मंत्री होतात, यावर पक्षाद्वारे नगरच्या पालकमंत्र्याची नियुक्ती निश्चित होणार आहे.
जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांपैकी कोणी राज्यमंत्री झाले तर त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याऐवजी बाहेरच्या जिल्ह्यातील असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांवर जिल्ह्याचे पालकत्व पार पाडण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असेही पक्ष सूत्रांकडून सांगण्यात येते.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांत सध्या आ.संग्राम जगताप हेच सिनिअर आहेत,त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची अधिक संधी आहे. विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन संग्राम जगताप यांनी केलेल्या कार्यामुळे ते दुसर्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत.
त्यांच्याकडे विकासात्मक व्हिजन असून, ते पालकमंत्री झाल्यास शहरासह जिल्ह्याचा विकास होईल असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.