अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नयेत असा आदेश आहे.
मात्र, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का असा सवाल विचारला जात आहे.
या मोर्चासाठी पोलिसांनी महामार्गावरील चौकात वाहतुकीस बंदी घातली होती. त्यामुळे चौकात वाहनांची गर्दी झाली होती. दूध दरवाढीच्या मागणीच्या आंदोलनासाठी आधी कोठला चौकात आंदोलक एकत्र जमले होते.
तिथे मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न ठेवता शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाताना मोर्चातही मोठी गर्दी होती.
तसेच या मोर्चामुळे महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे एकाच ठिकाणी चौकाचौकात वाहनांची गर्दी झाली. ही गर्दीही कोरोनाच्या प्रादुर्भावाला पोषक ठरली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved