नवी दिल्ली: Jio रिलायन्स कंपनीला नफा होत असताना मात्र व्हाेडाफाेन-आयडियाचा वाढता ताेटा कंपनीला कुलूप लावण्याच्या दिशेने घेऊन जात आहे.
कंपनीचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्लांनी शुक्रवारी सांगितले की, मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारककडून दिलासा मिळाला नाही तर कंपनी बंद हाेऊ शकते.

दूरसंचार कंपन्यांवरील कर्जाचा बाेजा इतका वाढला आहे की कंपनी चालवणे मुश्कील झाले आहे. या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या परिस्थितीचा अंदाज यावरून लावता येऊ शकताे की, व्हाेडाफोन- आयडियाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला मदत मिळाली नाही तर कंपनी बद हाेऊ शकते असे सांगतात.
कंपनी आणखी जास्त पैसे गुंतवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये बाेलताना ते म्हणाले, जर सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर नाइलाजाने आम्हाला आमचे दुकान (व्हाेडाफाेन-आयडिया) बंद करावे लागेल.