राहुरी | नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी २३ मे रोजी कोरडा दिवस पाळण्याचा आदेश दिला.

या दिवशी जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, परवाना कक्ष, देशी-विदेशी दारु दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येतील. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास येताच संबंधिताविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. भरारी पथकाद्वारे अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

- झाडे लावून वाढदिवस साजरा करणार, आमदार विक्रम पातपुते यांचा वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम
- तरूण पोरांची लग्न होत नसल्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर झाला मोठा परिणाम, शाळांमध्ये नव्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
- पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4,000 रुपये गुंतवा आणि 60 महिन्यांनी 2,85,459 रुपये मिळवा, कस पहा संपूर्ण गणित
- गणेश भांड यांचा शिवसेना मध्ये प्रवेश ! विखे पाटलांचे समर्थक थेट शिंदे गटात…
- अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात वाढ; वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगा महागल्या