अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : आमदार नीलेश लंके यांनी टाकळीहाजी येथे जाऊन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी राजेंद्र जासूद, जि. प. सदस्य सुनीता गावडे, राजेंद्र गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, माजी उपसरपंच अजित गावडे आदी उपस्थित होते.
पोपटराव गावडे म्हणाले,आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून थोड्याच दिवसात नावलौकीक मिळवला असून देशाचे नेते शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे.
जनतेच्या संपर्कात सर्वाधिक असलेले आमदार म्हणून लंके यांचाच नावलौकिक आहे. कोरोनाच्या संकटात तालुक्यातील असो की, बाहेरील व्यक्ती असो त्यांना उपाशी राहू न देता जनतेच्या आरोग्याची काळजी त्यांनी घेतली.
शरद पवार यांचा समाजसेवेचा विचार व वारसा ते पुढे चालवत आहेत. आमदार लंके यांनी तालुक्यात झालेल्या विकासकामांची माहिती त्यांना दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews