अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- विराट कोहलीसाठी दु:खद बातमी आहे. सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या सामन्यापूर्वी कोहलीनं आपल्या जवळची खास व्यक्ती गमवली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे बालपणीचे कोच सुरेश बत्रा यांचं निधन झालं आहे. विराटला लहान असताना त्याला क्रिकेटचे धडे देणारे प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विराट कोहलीने पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. तेव्हा विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा होते. त्याचवेळी सुरेश बत्रा या अकादमीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.
विराटला क्रिकेट शिकवणारे सुरेश बत्रा यांनी वयाच्या 53 व्या वर्षी आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. वरिष्ट क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्वीटकरून याबाबत माहिती दिली. सुरेशा बत्रा यांनी गुरुवारी सकाळी पूजा केली आणि अचानक खाली कोसळले.
विराट कोहलीचे बालपणीचे कोच होते. त्यांच्या निधनानं क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. राजकुमार शर्मा यांनी आपला छोटा भावू हरपल्याची भावना व्यक्त करत ट्वीटवर श्रद्धांजली वाहिली आहे. क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला विराट कोहली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणासाठी यायचा.
त्यावेळी राजकुमार शर्मा प्रमुख प्रशिक्षक होते, तर सुरेश बत्रा त्याच अकादमीत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करायचे. विराट कोहलीच्या फलंदाजीला पैलू पाडण्यात, त्याला फलंदाज म्हणून घडवण्यात राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांचा मोलाचा वाटा आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम