अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव | कुंभारीपाठोपाठ येसगाव येथील तलाठी ज्योती वसंतराव कव्हळे (वय ३२) हिने प्रतिज्ञापत्रात निर्माण केलेल्या भाराचा तपशील सात-बारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच मागितली.
तडजोड करून ८०० रुपये रोख घेताना तिला रंगेहात पकडण्यात आले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. नाटेगाव येथील तक्रारदाराने आपल्या प्रतिज्ञापत्रावर निर्माण केलेल्या भाराचा बोजा उताऱ्यावर चढवायचा होता.
त्यासाठी तलाठी कव्हळे हिने एक हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.
नाशिकचे अधीक्षक अभियंता सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, संदीप साळुंके, वैभव देशमुख, प्रवीण महाजन, विनोद पवार यांनी सापळा रचून कव्हळे हिला पकडले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved