महिलेची १७ लाखांची फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो असे सांगुन विश्­वास संपादन करून १७ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाण येथे घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व सदस्य यांनी रूषाली गणेश होळकर (वय ३२, रा.खातगाव टाकळी, नगर) यांना शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो, असे सांगुन मुलाखत घेऊन तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर दिली व वेळेवर पगार मिळण्याची हमी दिली.

त्यानंतर त्यांनी संगनमत करून होळकर यांच्याकडुन काही रक्कम घेतली व शासनाची ऑर्डर मिळवुन देवू असे सांगुन विश्­वास संपादन केला. त्यानंतर सौ. होळकर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन व पगार न देता त्यांची फसवणुक केली.

सौ. होळकर यांनी पगाराची व दिलेल्या पैशांची एकुण रक्कम १७ लाख रूपयांची मागणी केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दम दिला. या प्रकरणी सौ. होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बेंडकोळी हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment