अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 88 ग्रामपंचायती प्रशासकाच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्ताराधिकारी, त्या दर्जाच्या शाखा अभियंत्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्याने अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राज्यातील सरपंच परिषद, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच सरकारी आदेशाप्रमाणे प्रशासक नियुक्तीस विरोध केला होता.
काही सामाजिक संघटना, सरपंच परिषदेने तर थेट न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या. यामुळे राजकीय पदाधिकारी- कार्यकर्त्यांऐवजी शासनाने अधिकाऱ्यांच्या प्रशासकपदी नियुक्त्या केल्या आहेत.
ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल तेथे संबंधितांनी ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून कारभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे. या प्रशासकांना मूळचा पदभार सांभाळून प्रशासकपदाचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved